College News

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात “इनोव्हेशन मॅनेजमेंट” या विषयावर  राष्ट्रीय परिषदेचे  आयोजन

शेगाव: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील एम. बि. ए. विभागातर्फे “इनोव्हेशन मॅनेजमेंट”  या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद २२ एप्रिल आणि २३ एप्रिल ला आयोजित केली आहे.  अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली चे अनुदान राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी प्राप्त झाले आहेत. या परिषदेत नामांकित शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यांना इनोव्हेशन मॅनेजमेंट या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

इनोव्हेशन मॅनेजमेंट या बाबत निगडीत अनेक बाबींवर चर्चा या परिषदेत होणार आहे.  प्राध्यापक, उद्योगजगतातील व्यक्ती तसेच संशोधक विद्यार्थी यांनी कॉन्फरन्ससाठी सादर केलेले रिसर्च पेपर्स आयएसबीएन क्रमांक असलेल्या नामांकित प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले जाणार आहेत. विविध राज्यांमधून जवळपास सत्तर प्राध्यापक आणि विद्यार्थी या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाचे संचालक, प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली एम.बि.ए. विभागाचे प्रमुख तसेच समन्वयक आणि सहसमन्वयक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कार्य पूर्णत्वास नेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *