College News

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विद्यापिठ संघात निवड

शेगाव: येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठाच्या संघात निवड झाली.

यामध्ये तन्वी नानोटे या विद्यार्थिनीची व्होलीबॉल संघात, मनन गोएल बास्केटबॉल तर जयश्री शेट्ये ची बॉक्सिंग संघात निवड झाली.  या तीन विद्यार्थ्यांना कलर कोट प्राप्त झाला. ते  आंतर-विद्यापिठ स्पर्धांमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठ, अमरावतीचे प्रतिनिधित्व करतील.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा दृष्टीने महाविद्यालय नेहमी प्रोत्साहन देत असते.त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध कलाप्रकारात सहभागी होऊन यश मिळवत असतात. अभ्यासाबरोबरच खेळ, संगीत, नृत्ययासारख्याकलांमध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण करण्यासाठी विविध सोई-सुविधा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे पुरवल्या जातात. महाविद्यालयात बॅडमिंटन कोर्ट, स्केटिंग ग्राउंड, क्रिकेट मैदान, व्होलीबॉल  कोर्ट उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *