श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत या विषयावर कार्यशाळेचे आयोजन संपन्न
शेगाव: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती या विषयावर शनिवार, दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी कार्यशाळा संपन्न झाली. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये हि कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. आयोजक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करून प्रास्ताविक केले. या प्रसंगी श्री. गजानन शिक्षण संस्थेचे सचिव श्री. शरदजी शिंदे, मास्टर ट्रेनर डॉ. केदार ठोसर, डॉ. एस. बि. सोमाणी, डॉ. जयकुमार शर्मा, डॉ. गोकुळ डामरे, डॉ. राजेंद्र कोरडे, डॉ. अनंतकुमार कुलकर्णी, डॉ. संतोष बोथे, डॉ. रामेश्वर खड्सन व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेत श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री. डी. एम. बुरुंगले विज्ञान व कला महाविद्यालय, सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, माउली ग्रुपचे अभियांत्रिकी महाविद्यालय, स्व. उत्तमराव देशमुख बी.एड. महाविद्यालय, जि. बि. मुरारका कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल या आठ महाविद्यालयांमधील प्राचार्य, प्राध्यापक, व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी असे एकूण २२१ प्रतिनिधी सहभागी झाले.
डॉ. केदार ठोसर यांनी सलग चार सत्र उपस्थित प्राध्यापकांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत या विषयावर मार्गदर्शन केले. सहभागी प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत, त्यात शिक्षक, महाविद्यालये आणि विद्यापीठ यांची भूमिका तसेच अभ्यासक्रम कसा असेल, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायची अशा अनेक बाबींवर डॉ. केदार ठोसर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेत झालेल्या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच अशा कार्यशाळा पुन्हा-पुन्हा व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. सहभागी प्राध्यापकांनी आयोजक महाविद्यालयाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.