श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

शेगाव: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथे करिअर मार्गदर्शन कक्षाद्वारे  अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागातील विद्यार्थ्यांसाठी दर शनिवारी विविध तज्ञाद्वारे सरकारी नोकऱ्या, संरक्षण, नागरी सेवा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादींमध्ये उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधी बद्दल मार्गदर्शन केले जाते.  शनिवार, दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी विद्यार्थ्यांचे नागरी सेवामध्ये आवड वाढावी व विद्यार्थ्यांनी नागरी सेवा मध्ये आपले करिअर करावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जाणीव होणे गरजेचे असून जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून चांगले करिअर करणे आवश्यक आहे. या उद्देशाने महाविद्यालयाने हे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी मार्गदर्शक म्हणून  श्री जी. श्रीधर (IPS), पोलिस अधीक्षक, अकोला हे उपस्थित होते. श्री. जी. श्रीधर (आयपीएस) यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली असून  ते नागरी सेवांसाठी तयारी करणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सोमाणी यांनी पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

श्री. जी. श्रीधर यांनी  “नागरी सेवा परीक्षांची तयारी कशी करावी?” या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या व्याख्यानात त्यांनी  नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी केलेले स्वतःचे अनुभव शेअर केले आणि विद्यार्थ्यांना नागरी सेवांमध्ये त्यांचे करिअर करण्यासाठी प्रेरित केले. या दरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.  या निमित्ताने नागरी सेवा परीक्षांची ओळख अधिक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना झाली. नागरी सेवा क्षेत्रामध्ये काम करू इच्छित असणारी विद्यार्थ्यांसाठी या व्याख्यानामुळे खूप मदत होईल. त्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाईल. तसेच या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी श्री. जी. श्रीधर यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केलेले अनुभव त्यांना कामी येतील. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये करिअर करावे यासाठी महाविद्यालय सातत्याने त्या क्षेत्रामधील यशस्वी व्यक्तींना महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते. श्री. जी. श्रीधर यांचे “नागरी सेवा परीक्षांची तयारी कशी करावी” हे व्याख्यान त्याचाच एक भाग आहे.

या सत्रासाठी मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते.  या व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी टी.पि.ओ., करिअर मार्गदर्शन कक्षाचे समन्वयक यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *