College News

उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

शेगाव: श्री गजानन शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव व मुंबई/ विदर्भ क्रिकेटचे  रणजी विजेते प्रशिक्षक श्री. सुलक्षण कुलकर्णी यांचे संयुक्त विद्यमाने शेगांव येथील अतिभव्य क्रिकेट मैदानावर 20 एप्रिल ते 30 मे दरम्यान उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर भरवले जाणार आहे.  8 ते 23 वयोगटातील मुला/ मुलींना शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षण सुलक्षण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे.

सदर उन्हाळी शिबीर सकाळ व  संध्याकाळ अशा दोन सत्रात  चालणार असून यात मुलांना फिटनेस,  योगा, सराव सामने खेळविण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा.

अंकित तिवारी : 7972506118

चरणसिंग बोराडे : 9503899090

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *