College News

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील  अभियांत्रिकीच्या चार  शाखांना एन.बी.ए. मानांकन

शेगाव: श्री गजानन शिक्षण संस्था संचलित श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील  अभियांत्रिकीच्या चार  शाखांना अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या एन.बी.ए. कडून तीन वर्षांसाठी मानांकित करण्यात आले आहे. त्या बाबतचे  पत्र नुकतेच महाविद्यालयास प्राप्त झाले.

१९८३ पासून श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय अभियांत्रिकी क्षेत्रात महत्वाचे योगदान देत आहे. हे विदर्भातील नामांकित महाविद्यालय असून चार अभियांत्रिकी शाखांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशनचे जागतिक दर्जाचे मानांकन मिळाले.  एन.बी.ए. चे मानांकन कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग व मेकॅनिकल इंजिनिअरींग या शाखांना तीन वर्षांसाठी प्राप्त झाले.

नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशनच्या तज्ञ मार्गदर्शक समितीने महाविद्यालयास भेट देऊन विविध अभियांत्रिकी शाखांची व महाविद्यालयाची गुणवत्ता वेगवेगळी परिमाणे तपासून मूल्यांकन केले. सदर समितीने संस्थेतील एकंदर शैक्षणिक वातावरण, संस्थेचे ध्येय्य, उदिष्टे, विद्यार्थ्यांचा निकाल, टिचिंग-लर्निंग, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, प्राध्यापक वृंदाचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, सोयी व सुविधा, निरंतर प्रगती, विद्यार्थी सहाय्य व्यवस्था, ग्रंथालय, प्रयोगशाळा, औद्योगिक संवाद, संशोधन, संस्थेचे गव्हर्नंस अशा अनेक बाबींचे मूल्यांकन करुन गुणवत्तेच्या आधारावर मानांकन दिले.

एन.बी.ए. मानांकन  मिळवणारी बोटावर मोजण्या इतकी महाविद्यालये राज्यात आहेत. एन.बी.ए. मानांकन मिळाल्यामुळे महाविद्यालयाला विशिष्ट दर्जा प्राप्त झाला आहे. या निमित्ताने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या आधी सुद्धा  महाविद्यालयाच्या विविध शाखांना एन.बी.ए मानांकन मिळाले आहे. या यशामध्ये महाविद्यालयाचे संचालक, संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य रजिस्ट्रार, अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद, कर्मचारी, पालकवर्ग, विविध उद्योगसमूह, माजी विद्यार्थी आणि सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *