संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वार्षिक राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचे यश

शेगाव: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित स्टार्ट अप फेस्ट २०२२ मध्ये यश प्राप्त केलं. विद्यापीठातर्फे दरवर्षी अँन्युअल नॅशनल स्टार्ट अप फेस्ट अंतर्गत विविध प्रकारांमध्ये प्रकल्प स्पर्धा आयोजित केली जाते. ५ आणि ६ मे रोजी ही स्पर्धा विद्यापिठात आयोजित केली होती. या वर्षीचा विषय स्टुडंट इंनोव्हेशन, स्टार्ट अप्स आणि इको सिस्टम होता. यामध्ये विद्यापीठाला संलग्नित महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होऊन प्रकल्प सादरीकरण करतात. या स्पर्धेचा उद्देश हा शास्त्रज्ञ, तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून माहितीची आदानप्रदान करणे व सध्या तंत्रज्ञानात होत असलेले बदल अभ्यासणे हा आहे.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन आपले प्रकल्प सादर केले.  दोन प्रकारात प्रथम तर एका प्रकारात द्वितीय पारितोषिक विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोहिल शेख आणि हरीश देशमुख यांना प्रथम पारितोषिक तर प्रद्युम्न राऊत आणि स्वप्नील दाभाडे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. परमाणु व दूरसंचार विभागाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी राजन गुप्ता आणि अमेय सांगोले यांना प्रथम पारितोषिक मिळाले.  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. महाविद्यालयाचे संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.