Placements

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड!

शेगाव: येथील श्री गजानन शिक्षण संस्था संचलित श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड झाली. या कंपनीतर्फे पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या  विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला ऍप्टिट्यूड, तांत्रिक मुलाखत व शेवटी एच.आर.राउंड झाला.  त्यात एकूण चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड झाली. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आली.

या निवड प्रक्रियेतून कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींगमधून तेवीस, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधून विस, इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीमधून एकोणवीस, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून तीन  तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमधून नऊ  अशा एकूण सत्तर विद्यार्थ्यांची निवड झाली.

लॉकडाऊन च्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याची काळजी महाविद्यालयाने घेतली. ऑनलाइन पद्धतीने विविध प्लाटफॉर्म चा वापर करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. उद्योगजगताला अपेक्षित कौशल्ये त्यांच्यात रुजविली जात आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. त्या अनुषंगाने कंपन्यांना अपेक्षित संवाद, तांत्रिक, तार्किक, बुद्धिमत्ता क्षमता, बॉडी लँग्वेज, टिम वर्क, सृजनशीलता, व्यवस्थापन ई. सारखी  कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, सेमिनार ई. चे आयोजन वर्षभर सुरु असते.

तसेच उद्योग जगतात सुरु असलेले बदल अंगीकारण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक माहिती होण्यासाठी तसेच उद्योग जगताची खोलवर माहिती व्हावी यासाठी   विद्यार्थ्यांना इंटर्नशिप साठी विविध कंपन्यांमध्ये पाठवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढीस लागून त्यांची कौशल्ये वृद्धिंगत होतात.  पुस्तकी ज्ञान आणि प्रात्यक्षिक ज्ञान यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असतो. आपण काय शिकत आहोत, त्याचा उद्योग जगतात काय उपयोग आहे तसेच अजून काय करायला हवं याची जाणीव विद्यार्थ्यांना होते. त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने कंपन्यांमध्ये उच्च पदावर नियुक्त होत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२   ची निवड प्रक्रिया सुरु झाली असून पात्र विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जात आहे. आतापर्यंत २१५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.  येत्या काही कालावधीत अनेक नामांकित कंपन्याचे ड्राईव्ह होणार आहेत. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

महाविद्यालयाचे संचालक, प्राचार्य, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, सर्व विभागप्रमुख यांच्यासह सर्वप्राध्यापक, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *