College News

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इम्पीरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनिअर्स, नोएडा सोबत सामंजस्य करार

शेगाव: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागाने एका संक्षिप्त समारंभात इम्पीरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनिअर्स, नोएडा, उत्तर प्रदेश यांच्या सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याचा उद्देश भारतातील तरुणांना कुशल आणि रोजगारक्षम बनविणे हा आहे.  या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी. सोमाणी, आणि इम्पीरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनिअर्सचे संस्थापक आणि सि.ई.ओ.  श्री. विनोद गुप्ता यांनी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली.

या सामंजस्य करारामुळे महाविद्यालयात  सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेइकलची स्थापना करणे शक्य होणार आहे. हे सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण देईल आणि ईव्ही, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम्स, ड्राइव्हट्रेन्स आणि इलेक्ट्रिक व्हेईकल मधील इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल्स या क्षेत्रातील संशोधनावरही लक्ष केंद्रित करेल. याचा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अश्या प्रकारचे हे महाराष्ट्रातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स असेल. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या डिप्लोमा आणि आय.टी.आय. च्या  विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी महाविद्यालयाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर अनेक कंपन्यांबरोबर सामंजस्य करार झालेले आहेत. अशा करारामुळे महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच संशोधनाचे वातावरण निर्माण झाले आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी  मिळावे या हेतूने १९८३ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत.

महाविद्यालयाच्या  विद्युत अभियांत्रिकी विभागाने सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी  कठोर परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी इम्पीरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनिअर्सचे श्री. विनोद गुप्ता, श्री. शुभंकर चक्रवर्ती आणि सौ. रूपाली अग्रवाल आणि महाविद्यालयाचे  माननीय व्यवस्थापन प्रतिनिधी, प्राचार्य, विविध विभागांचे प्रमुख, अधिष्ठाता  आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *