College News

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक प्रदान

शेगाव: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठ, अमरावती च्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२१  च्या निकालात विद्युत अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी मिथिलेश जोशी विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. २५ मे ला अमरावती विद्यापीठाच्या ३८ व्या दिक्षांत समारंभात त्याला कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदक (सर्व शाखांमधून सर्वाधिक गुण प्राप्त करणारा विद्यार्थी), स्व. श्री. अमित बडे स्मृती सुवर्णपदक (सर्व शाखांमधून सर्वाधिक गुण प्राप्त करणारा विद्यार्थी), स्व. जि. एच. रायसोनी सुवर्ण पदक (विद्युत अभियांत्रिकी शाखेतून विद्यापिठात प्रथम), श्री अंबादास धांडे सुवर्णपद (परमाणु, किंवा सं. शा. किंवा विद्युत शक्ती या शाखांमधून सर्वाधिक गुण प्राप्त करणारा विद्यार्थी), आणि स्व, श्री. कृष्णमोहन, पि. मल्लीकार्जुनराव सि. श्रीनिवासराव व अनिस माथुर सुवर्णपदक (सर्व शाखांमधून सर्वाधिक गुण प्राप्त करणारा विद्यार्थी) ई. नी सन्मानित केल्या गेले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती च्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२१  ची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून त्यामध्ये श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या  ९९ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादित करीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.  या निमित्ताने  महाविद्यालयाने आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.  या निकालाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाविद्यालयाचे संचालक, प्राचार्य, रजिस्ट्रार, अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी  विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *