शिक्षण
शिक्षण म्हणजेच प्रगती; शिक्षण म्हणजेच आपल्याप्रती केलेली एक सेवा. आपल्या देशामध्ये शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी रुजविला. आणि आपण सर्व त्यांच्या पावलांवर चालत आहोत. ज्याप्रमाणे व्यक्तीला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज आहे त्याप्रमाणे शिक्षण सुद्धा खूप आवश्यक आहे. शिक्षण आपल्याला जगण्याची कला शिकविते. आपल्या मध्ये चांगले संस्कार, विचार, ज्ञान ई. ची भर पडते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुला-मुलींनी चांगली प्रगती केली आहे. आयुष्यामध्ये शिक्षण घेऊन काहीतरी साध्य करायचे हा प्रत्येकाचा हेतू असतो. शिक्षणामुळे चांगले-वाईट मधील फरक कळतो. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पत्करलेला मार्ग योग्य हवा. शिक्षणामुळे त्याची जाणीव प्रत्येकाला होते. शिक्षण हा आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेऊन आपले आचार-विचार, गुण अंगीकारावे. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे. तर आपल्या चुकांपासून शिकणे आणि इतरांना सुद्धा योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत करणे होय. आपल्यापासून या सर्व गोष्टींची सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शिका आणि इतरांना सुद्धा शिक्षण घेण्यास प्रवृत्त करा.
किर्ती राउत
द्वितीय वर्ष
परमाणु आणि दूरसंचार अभियांत्रिकी